हिंदुस्थानी उसेन बोल्टचा ट्रॅकवर धावण्यास नकार, श्रीनिवास गौडाने दुखापतीमुळे चाचणी टाळली

439

कर्नाटकातील ‘कंबाला’ या पारंपरिक शर्यतीत उसेन बोल्टचा विक्रम मोडल्याच्या बातम्या आल्याने रातोरात स्टार झालेल्या श्रीनिवास गौडाने हिंदुस्थान क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) चाचणी शर्यतीत ट्रकवर पळण्यास नकार दिला आहे. ‘कंबाला’ शर्यतीत धावताना पायाला दुखापत झाल्याने आपण या चाचणीत सहभागी होऊ शकत नाही असे त्याने स्पष्ट केले. बैलांसोबत पळण्याच्या शर्यतीत श्रीनिवासने 100 मीटरचे अंतर अवघ्या 9.55 सेकंदांत पूर्ण करून उसेन बोल्टचा 9.58 सेकंद वेळेचा विक्रम मोडल्याची चर्चा रंगली आहे. श्रीनिवासचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याची दखल घेऊन केंद्रीय क्रीडामंत्री विरेज रिजिजू यांनीही ‘साई’च्या अधिकाऱयांना निर्देश देत श्रीनिवासच्या प्रशिक्षणाची सोय केली.

आपली प्रतिक्रिया द्या