श्रीरामपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावात महिलेचा मृतदेह

श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तिसऱ्यांदा मृतदेह सापडल्याने नागरीकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. शहरानजिक असलेल्या गोंधवणी परिसरातील साठवण तलावात एका महिलेचा मृतदेह आढळुन आला. मुस्कान सलमान शेख (वय 20, रा.पढेगाव) असे मयत महिलेचे नाव आहेत. यापुर्वीही सदर पाणीसाठवण तलावात एका महिलेसह एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा.मृतदेह आढळल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला.

मुस्कान ही विवाहीत असुन येथील मिल्लतनगर परिसरातील नजीर सय्यद यांची ती मुलगी आहे. मागील काही दिवसांपासुन ती माहेरी राहत असुन नागरीकांना दुपारच्या सुमारास तलावातील पाण्यात तरंगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला. सदर माहिती शहर पोलिसांना मिळताच सहायक पोलिस निरिक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देवुन पहाणी केली. पालिका कर्मचारयांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढुन पंचनामा करण्यात आला. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटल्यानंतर उत्तरणीय तपासणीसाठी कामगार रुग्णालयात पाठविण्यात आला.

मागील दोन महिन्यांपुर्वी एका तरुणांचा मृतदेह पाणीसाठवण तलावात आढळुन आला होता. तसेच एक वर्षापुर्वीही एक अनोखळी महिलेचा मृतदेह तलावात आढळला होता. गोंधवणी येथील पाणीसाठवण तलावातील पाणी शहर परिसरात पिण्यासाठी वापरले जात असल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला. पाणी साठवण तलावात मृतदेह आढळुन येत असल्याने साठवण तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीसाठवण तलावाची सुरक्षा यंत्रणा वाढवुन तलाव परिसरात फिरणारया नागरीकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या