नागपूर विभागात गडचिरोली अव्वल

27

सामना प्रतिनिधी । नागपूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार १३ जून रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. नागपूर विभागाचा निकाल ८३.६७ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलणेत यंदा निकालाची टक्केवारी १.६७ टक्क्यानी घटली असून गडचिरोजी जिल्ह्याने (८५.४९टक्के) निकालात नागपूर विभागातून बाजी मारली आहे.

नागपूर विभागीय शिक्षण मंडळाअंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो.  विभागीय मंडळामार्फत मार्च २०१७ मध्ये माध्यामिक शालांत  प्रमाणपत्र  परीक्षा अर्थात इयत्ता दहावीची परीक्षा (७ मार्च ते १ एप्रिलदरम्यान) घेण्यात आली. यात नागपूर विभागातून १ लाख ७५ हजार ६९४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १ लाख ७४ हजार ८०५ विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले. यापैकी १ लाख ४६ हजार २५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवशीपासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना उत्तर पत्रिकेची छायाप्रत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  यासाठी आवश्यक त्या अर्जाची प्रत काढून अर्ज भरता येईल. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसांक्षाकीत प्रतीसह १४ ते २३ जून पर्यंत अर्ज करता येईल़ तसेच उत्तरप्रतिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसाच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या