पाच दिवसांत एसटीमार्फत 72 हजार श्रमिकांची वाहतूक

863

एसटी महामंडळाने राज्यात अडकलेल्या नागरिकांसाठी सुरु केलेल्या मोफत बससेवेमध्ये पाच दिवसांत 72 हजार 956 मजूरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूपपणे सोडण्यात आले आहे. तर बुधवारी 1200 बसेस मार्फत 27 हजार मजूरांची वाहतूक करण्यात आली आहे. नागरिकांना अवैध आणि धोकादायक प्रवास टाळून एसटीच्या बसेस मार्फत सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे.

गेल्या दोन दिवसात अवैधरित्या प्रवास करणाऱ्या श्रमिकांचे अपघात पाहता, राज्य परिवहन विभागाच्या भरारी पथकाद्वारे अशा अवैध व धोकादायक प्रवास करणाऱ्या वाहनावर कारवाई होऊ शकते.त्यामुळे श्रमिक- मजुरांनी अवैधरित्या व धोकादायक पद्धतीने प्रवास न करता एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे. तसेच एसटी महामंडळ व राज्य परिवहन विभाग यांनी आपली मोहिम अधिक तीव्र केली असून, एसटी व राज्य परिवहन विभागांने स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सातत्याने आपल्या गावी निघालेल्या श्रमिक-मजुरांचा शोध घेवून, त्यांना तातडीने एसटी बसेस उपलब्ध करून देत असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

आज 1200 बसद्वारे 27 हजार मजूरांची वाहतूक

एसटी महामंडळाने आज बुधवारी तब्बल 1200 बसद्वारे 27 हजार 528 मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविले. विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसांत राज्यातील 72 जार 956 श्रमिक-मजुरांना या सुरक्षित प्रवासी वाहतूकीचा लाभ झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या