परशुराम घाटात एसटी बसला टँकरची धडक

मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एसटी बसला पाठीमागून टँकरने धडक दिली. यात एसटी बस रस्त्याच्या एका बाजूला कलंडली. यात दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये तब्बल 64 प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने एसटी बस रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडल्याने अनर्थ टळला. अन्यथा उजव्या बाजूला दरीचा मोठा धोका होता. आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला.

चिपळूण आगारातील एसटी बस खेडहून चिपळूणला येत असताना परशुराम घाट माथ्यावरील अवघड वळणावर आली असता हा अपघात घडला. चौपदरीकरणाअंतर्गत या वळणाच्या ठिकाणी अंडरपास मार्ग उभारला जात आहे. त्यासाठी पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली आहे.