मेहकर जानेफळ रस्त्यावर एस.टी.बस व टीप्परची धडक, 24 प्रवासी जखमी

मेहकर जानेफळ रस्त्यावर समृध्दी महामार्ग पुलाच्या जवळ शेगाव वरुन मेहकरला येणारी एसटी. बस समोरच्या टीप्परला धडकल्याने चालकासह बसमधील एकुण 24 प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यास छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले आहे. हा अपघात आज 24 मार्च रोजी सकाळी अंदाजे साडेनऊच्या दरम्यान झाला. मेहकर आगाराची बस क्रमांक एम.एच.14 बी.टी.4543 ही शेगाव वरुन मेहकरला येत असता मेहकर जानेफळ रस्त्यावर समृद्धी महामार्ग पुलाजवळ समोरचे चालू टीप्पर अचानक थांबल्याने बसची टीप्परला मागुन जोरदार धडक बसली. या अपघातात बसमधील चालक डी.ए.काकडे व 23 प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये पुंजाजी रंगनाथ बोरकर (हिवरा खुर्द,ता.मेहकर), माधव अमृता नळगे (इसोली,ता.चिखली), रत्नकला विष्णू काळे (डोणगाव, ता.मेहकर), कु. श्रावणी राजू जाधव (पिंपरखेड,ता.चिखली), पांडुरंग शंकर भोलनकर (पिंपरखेड,ता.चिखली), विमल विठोबा गायकवाड (हिवरा खु.ता.मेहकर), रुख्मिना भिमराव अवसरमोल (घाटनांद्रा,ता.मेहकर), किरण राजू जाधव (पिंपरखेड, ता चिखली), रामेश्वर सखाराम भोपळे (हिवरा खु.ता.मेहकर), मनोजसिंग देवसिंग राठोड (विठ्ठल वाडी,ता.मेहकर), सिद्धार्थ संतोष वानखेडे (गौंढाळा ता.मेहकर), प्रविण बोरकर (सावरखेड,ता.चिखली), परशराम देऊळकर (ब्रम्हपुरी, ता.मेहकर), रामेश्वर हिवरकर (हिवरा खु.ता.मेहकर), मदन गाडे (हिवरा खु.ता.मेहकर), सिताराम दळवी (हिवरा खू.ता.मेहकर), नामदेव फोलाने (जानेफळ ता.मेहकर), वाल्मिक सुरडकर (जानेफळ, ता.मेहकर), यश इंगळे (अमडापुर ता.चिखली), आश्रु बोरकर (हिवरा खु.ता.मेहकर), विठोबा गायकवाड, सतिष गायकवाड (हिवरा खु.ता.मेहकर), रविना राजू घायाळ (मुंदेफळ ता.मेहकर) यांचा समावेश आहे.

अपघात घडताच पोलीस प्रशासन व एस.टी.चे आगार प्रमुख संतोष जोगदंड, सहाय्यक वाहतूक निरीक्षक समाधान जुमडे, कामगार सेनेचे संजय मापारी, लिपिक अंकुश शिंदे, प्रवीण तांगडे, समाधान सोनवणे, विनोद चेके,अनिल सावळे, एस.बी.पाटील, संतोष मैंद घटनास्थळी गेले व पाहणी केली. बस चालक डी.ए.काकडे यांना गंभीर मार लागल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना संभाजीनगरला हलविण्यात आले आहे. दरम्यान एस.टी.प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करीत तातडीची मदत दिली असे आगार प्रमुख संतोष जोगदंड यांनी सांगितले.