एसटी कर्मचार्‍यांनाही लोकलमधून प्रवासाची परवानगी द्या; एसटी कामगार सेनेची मागणी

654

सरकारने अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या घटकांसाठी लोकल फेर्‍या सुरू केल्या आहेत. मात्र, त्या घटकांमध्ये एसटी कामगारांचा समावेश केलेला नाही. एसटी कर्मचारीही बेस्टच्या खांद्याला खांदा लावून मुंबई, ठाणे आणि पालघर येथे अत्यावश्यक समाज घटकांना सेवा देत आहेत. त्यामुळे एसटीच्या नालासोपारा, विरार, पनवेल ते बदलापूरपर्यंत राहणार्‍या कर्मचार्‍यांना कामावर येण्यासाठी लोकल प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने राज्याचे मुख्य सचिव आणि परिवहनमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

औद्योगिक विवाद अधिनियम 1947 अन्वये शासन निर्णयानूसार एसटी महामंडळाला लोकोपयोगी सेवा घोषित करण्यात आले आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईत वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्टरर्स, परिचारिका, पालिका, पोलीस, बँक, मंत्रालय आदीं अत्यावश्वक समाज घटकांना आतापर्यंत मुक्कामी पोहचविण्यासाठी एसटीच्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील बस फेर्‍या मदत करीत आहेत. त्यामुळे विरारपासून ते पनवेल, बदलापूरपर्यंत राहणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना उपनगरीय लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी पत्र लिहून राज्य सरकारला केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या