विदयार्थिनींसाठी तिसगावात एसटी सेवा, शिवेसेनेच्या मागणीला यश

71

सामना प्रतिनिधी । नगर

तिसगावच्या पारिसरातील मांडवे व आजूबाजूच्या गावांमध्ये वर्तुळाकार बस सेवा सुरू करण्याच्या आ. डॉ. गो-हे यांच्या मागणीला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी तात्काळ संमती दर्शविली असून येत्या सोमवारपासून ही सेवा सुरू होण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यातील ग्रामीण भागात मुली आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. अशा प्रकारांना आळा बसावा म्हणून मागणी केल्यानुसार राज्य सरकारने कोपर्डीच्या घटनेनंतर ग्रामरक्षक दलांच्या स्थापनेचा निर्णय घेतला असून याबाबत दिनांक १ मार्च २०१७ रोजी शासन निर्णयही प्रसिद्ध केला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून ग्रामीण भागात तातडीने ग्रामरक्षक दलांची स्थापना करण्याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना सूचित करून महिला आणि मुलीना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी
केली.

शुक्रवार, दिनांक २१ जुलै २०१७ रोजी नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे अज्ञात इसमाने दुचाकीवर लिफ्ट देऊन एका शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज दिलेल्या निवेदनात त्यांनी ही मागणी केली आहे.

या घटनेबाबत पाथर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध बलात्कार आणि बालकांचे लैंगिक शोषण विरोधी कायद्यानुसार गुन्हा क्रमांक एफ आय आर ४४०/०१७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आज आ. डॉ. गोऱ्हे यांनी नगरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक घनश्याम पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून या घटनेतील आरोपीला तत्काळ पकडून त्याच्यावर कठोर कार्यवाही करण्याबाबत
मागणी केली आहे.

आ. डॉ. गो-हे यांनी नगर जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बुरुटे यांच्याशी संपर्क साधून या मुलीला आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा आणि मेडिकल प्रोटोकॉलनुसार उपचार देण्याची विनंती केली आहे. अशा प्रकारच्या घटनामधील पीडित महिलांना रुग्णालयात उपचार देताना विशेष काळजी घ्यावी असे यावेळी सूचित केले. पिडीत मुलीच्या पालकांशीही बोलून आवश्यकता भासल्यास तिच्या पुढील शिक्षणासाठी काही स्वरूपाची मदत करण्याबाबत मदत करू असे सांगितले. ग्रामीण भागात मुली्ना सुरक्षेच्या अधिकाधिक उपाययोजना व्हाव्यात असे प्रतिपादन आ. डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केले.

आपली प्रतिक्रिया द्या