भलामोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येतोय

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने एका मोठय़ा मैदानाच्या आकाराएवढा मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा इशारा दिला आहे. या लघुग्रहाचे नाव ‘2008 जीओ-20’ असून तो फार वेगाने पुढे येत आहे. 24 जुलै रोजी तो पृथ्वीच्या जवळून जाणार आहे.

’2008 जीओ-20’ लघुग्रहाचा व्यास सुमारे 220 मीटर आहे. तो प्रतिसेपंद आठ कि.मी. वेगाने प्रवास करत आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असला तरी पृथ्वीला धोका असल्याचे कुठलेच कारण सध्या दिसत नाही. मात्र या लघुग्रहाचा आकार मोठा असल्यामुळे आणि तो पृथ्वीच्या जवळून जाणार असल्याने नासाकडून पूर्ण सतर्कता बाळगली जाणार आहे.

पृथ्वी आणि त्या लघुग्रहाचे गुरुत्वाकर्षण यांचा एकत्रित परिणाम होऊन अनेकदा लघुग्रहाची दिशा बदलण्याची शक्यता असते. तसे झाले तर तो लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याची  किंवा पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत या लघुग्रहाची दिशा बदलण्याचे तंत्र नासाकडे असले तरी त्यासाठी पुरेसा वेळ मिळेलच, याची खात्री नसते.

आपली प्रतिक्रिया द्या