माढा तालुक्यात हरणाची हत्या

139

सामना वृत्तसेवा । माढा

माढा तालुक्यातील अरण येथील टोणपे वस्तीजवळ एका ७-८ महिन्याच्या हरणाची अज्ञात व्यक्तीने हत्या केली. मारेकऱ्याने बंदुकीतून गोळ्या झाडून हरणाची हत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी ३च्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन वन विभागाने तपास सुरू केला आहे.

तवेरा गाडीतून आलेल्या ४-५ अज्ञातांनी हरणांच्या कळपावर बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात एका हरणाचा मृत्यू झाला. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे टोणपे वस्तीत भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारे जीन्स-टी शर्ट घालून वावरत होते.

आपली प्रतिक्रिया द्या