हैदराबादमध्ये टी-20 लढतीच्या तिकिटांसाठी चेंगराचेंगरी

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना 25 सप्टेंबरला  हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. रविवारचा हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर तीन वर्षांपासून आतुर असलेल्या प्रेक्षकांची गर्दी जमली होती. तसेच कोविड काळात कुठल्याही प्रेक्षकाला स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहता आला नव्हता. त्यामुळे क्रिकेटशौकिनांनी स्टेडियमबाहेर तुफान गर्दी केली होती. पोलिसांना चाहत्यांना सांभाळणे कठीण झाले. रात्री उशिरापासूनच चाहते तिकीट खरेदीसाठी स्टेडियमबाहेर पोहोचू लागले असल्याचे सांगण्यात येत आहे. जसजशी सकाळ होत गेली तसतशी गर्दी वाढत गेल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.