बास्केटबॉलपटू ब्रायंटचा मुलीसह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

266

अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट (41) याच्यासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. हवेत असताना हेलिकॉप्टरला आग लागून हा अपघात झाला. मृतांमध्ये ब्रायंटच्या 13 वर्षीय मुलीचाही समावेश असल्याची माहिती अमेरिकी मीडियाने दिली आहे. लॉस अँजेलिसपासून 65 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर कोबी ब्रायंटच्या मालकीचे होते. आग लागून हेलिकॉप्टर झुडपात कोसळले. त्यामुळे तिथेही आग लागली. आगीमुळे बचाव पथकाला मोठय़ा अडथळय़ांचा सामना करावा लागला. अपघात इतका भीषण होता की, हेलिकॉप्टरमधील कुणीही वाचू शकले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या