मी ट्रान्सजेंडर आहे! प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

X-Men आणि जुना यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीने ती ट्रान्सजेंडर (जन्माला आल्यानंतर जे लिंग असते त्याच्याविरूद्ध आकाराला येणारी व्यक्ती) असल्याचा खुलासा केला आहे. ट्विटरवर तिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्याद्वारे तिने हा खुलासा केला आहे. एलन पेज असं या अभिनेत्रीचं नाव असून तिने आता एलियॉट पेज असं नाव घेतलं आहे.

elliot-page

नेटफ्लिक्सवरील अंब्रेला अकॅडमी या वेबसिरीजमध्येही झळकली होती. एलियॉटने विविध समाजमाध्यमांवर ही पोस्ट शेअर करत असताना म्हटलंय की “मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी ट्रान्सजेंडर असून मला तुम्हा ‘तो’ किंवा ‘ती’ काहीही म्हणा माझं नाव एलियॉट आहे”

मंगळवारी पूर्वाश्रमीच्या एलन आणि आताच्या एलियॉटने ही पोस्ट शेअर केली असून पोस्ट शेअर करत असताना मला बराच आनंद होतोय तसंच तीव्र टीकेचा सामना करावा लागण्याची शक्यताही वाटतेय असं म्हटलंय.

elliot-page-close-image

एलियॉट हा कॅनडामध्ये जन्माला आलेला आणि हॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून बऱ्यापैकी नाव कमावलेली व्यक्ती म्हणून अनेकांना परिचित आहे. एलियॉटने समलिंगी विवाह केला असून आपल्याला समलिंगी आणि ट्रान्सजेंडर असल्याचा आनंद असल्याचं म्हटलंय.

elliot-page-with-wife

एलियॉटने ज्या वेबसिरीजमध्ये काम केलं होतं, त्या अंब्रेला अकॅडमीची ट्विटर हँडलवरून त्याच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं असून ‘आमच्या सुपरहिरोबद्दल आम्हाला अभिमान आहे’ अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

अव्हेंजर्स चित्रपट मालिकेमध्ये ‘हल्क’ची भूमिका साकारणाऱ्या मार्क रफालो या अभिनेत्यानेही एलियॉटच्या या निर्णयाचं कौतुक करताना म्हटलंय की ‘आम्ही नशिबवान आहोत कारण तुझ्यासारखी व्यक्ती आमच्यासोबत आहे’

एलनने 2007 साली जुनो नावाच्या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. कुमारवयातील गर्भवतीची भूमिका त्याने साकारली होती. यानंतर इन्सेप्शन चित्रपटात त्याने अभिनेता लिओनार्डो कॅप्रियोसोबतही भूमिका केली होती. 2014 साली त्याने एक्स मेन डेज ऑफ फ्युचर पास्ट चित्रपटात महत्वाची भूमिका केली होती. 2014सालापासून त्याने हॉलीवूडमधील समलिंगी चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली होती. 2018 साली त्याने नर्तिका एम्मा पोर्टनरशी लग्न केलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या