गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्योतिबाचा राज्याभिषेक

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नव्या संकल्पांचा आणि नव्या उपक्रमांचा प्रारंभ होतो. स्टार प्रवाहवरील दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेत पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ज्योतिबाचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे.

आजवर ज्योतिबाच्या कथा-कहाण्या आपण ग्रंथांमधून वाचल्या आहेत. पण या मालिकेच्या रूपात ज्योतिबाचं महात्म्य प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळत आहे. गुढीपाडवा विशेष भागातून ज्योतिबाचा भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. याविषयी सांगताना ज्योतिबाची भूमिका साकारणारा अभिनेता विशाल निकम म्हणाला, ‘ज्योतिबाची भूमिका साकारणं माझ्यासाठी स्वप्नवत आहे. आता मालिकेत ज्योतिबाची राजा व्हायची वेळ आली आहे. पाडव्याच्या मुहुर्तावर महाराष्ट्राच्या या लाडक्या दैवताचा राज्याभिषेक होणार आहे. या विशेष भागासाठी आमच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. भव्यदिव्य सेटसोबतच, नयनरम्य रोषणाई, भरजरी वस्त्र, दुधाचा अभिषेक असा राजेशाही थाट आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या