अजिंक्य देव साकारणार बाजीप्रभू देशपांडे!

स्टार प्रवाहवर सुरू होणाऱया ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत स्वराज्यासाठी जिवाची बाजी लावणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा उलगडणार आहे. यात अभिनेता अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेविषयी अजिंक्य देव म्हणाला, ‘‘माझ्या करिअरची सुरुवात ‘सर्जा’ सिनेमातील ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे.

बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावन खिंडीमध्ये जिवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अशा या शूरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्प न असणार आहे. भूमिकेच्या तयारीविषयी तो म्हणाला, या भूमिकेसाठी माझा लूक नवा आहे. फिटनेसच्या बाबतीत मी नेहमीच जागृक असतो. व्यायाम आणि खाण्याकरचं नियंत्रण यामुळेच मी फीट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्क गरजेचं आहे. या सगळ्याचा उपयोग मला बाजीप्रभू साकारताना होतो आहे. या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची असून 26 जुलैपासून रात्री 10 वाजता ही मालिका भेटीला येईल.

आपली प्रतिक्रिया द्या