नागपूरमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

77
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी।नागपूर

नागपूर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट असून २०११ ते २०१७ या सात वर्षांत शहरात ६८ हजार २१८ लोकांना कुत्रा चावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी २०११ ते २०१५ या पाच वर्षात ८४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

शहरातील मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या बघता, यावर अंकुश लावण्यासाठी नागपूर महापालिकेतर्फे कुत्र्यांच्या नसबंदीची मोहिम राबविण्यात आली होती. हे काम खाजगी कंपनीकडे सोपविण्यात आले होते. दरम्यान,कंपनीने केलेल्या नसबंदीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पालिका मात्र मोहिम फत्ते झाल्याचे सांगत आहे. मात्र, कुत्र्यांची नोंदणी योग्यरित्या झाली नसल्यामुळे ही मोकाट कुत्री नागरिकांवरच हल्ला करू लागली आहेत. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यात ४ हजार ६२९ कुत्रे चावल्याची प्रकरणे पुढे आली.

आपली प्रतिक्रिया द्या