स्टेट बँकेच्या कोट्यवधी बचत खातेदारांना झटका

1865
sbi-poster

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. व्याज दरातील कपात 1 नोव्हेंबरपासून लागू होईल असे एसबीआयकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एक कोटी खातेदारांना मोठा धक्का बसणार आहे.

स्टेट बँक एक लाख रुपयांच्या ठेवींवर पाव टक्क्यांनी म्हणजे 0.25 टक्के कपात करणार आहे. परिणामी, नव्या नियमानुसार बचत खातेदारांना एक लाख रुपयांच्या ठेवीकर मिळणारे व्याज साडेतीन टक्क्यांवरून आता सव्वातीन टक्क्यांनी मिळेल. याआधी याच महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या रेपो रेटमध्ये कपात केली. त्यानंतर एसबीआयनेही आपल्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या