नगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

नगर-कल्याण महामार्गावर असलेल्या भाळवणी शिवारामध्ये होत असलेल्या अवैध मद्य वाहतुकीवर नगर व पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून सुमारे 22 लाख रुपये मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमध्ये गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य साठा, 2 चारचाकी, 1 सहाचाकी ट्रक जप्त केला आहे.

दिपक राधु गुंड, (वय – 39, रा. वडगाव गुंड, ता. पारनेर, जि. नगर), प्रकाश बाबाजी शेळके, (वय – 34, रा.कवाद कॅम्प, निघोज, ता. पारनेर, जि. नगर) यास अटक करण्यात आली असून राजु उर्फ राजेंद्र शिंदे हा गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार फरार आहे.

नगर-कल्याण महामार्गावर भाळवणी येथे अवैधरीत्या गोवा राज्य निर्मित मद्याची वाहतूक होणार असल्याची बातमी राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावून एक टाटा कंपनीचा सहा चाकी ट्रक (क्र. एमएच 14 ए एस 9531), एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट चारचाकी वाहन (क्र. एम एच 16 एम आर 9631) व एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर वाहन (क्र. एम.एच. 04 ई.डी. 3585) अशा तीन वाहनामध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीस प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य, 2 मोबाईल व इतर साहित्य असा 21 लाख 91 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

श्रीरामपूर व राहाता परिसरामध्ये छापे

नगर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने श्रीरामपुर व राहाता परिसरामध्ये हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर छापे टाकले. आरोपी साधना मोहन काळे, छाया सोनाजी शिंदे यांना अटक करण्यात आली असून, एक अज्ञात इसम फरार झाला आहे. सदरच्या कारवाईत हातभट्टी दारुसाठी लागणारे 4870 लिटर रसायन, 83 लिटर गावठी दारु व इतर सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या