शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी होणार नाही, सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण

22

सामना ऑनलाईन । मुंबई

‘मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी होणार नाही. हा पुतळा २१० मीटर उंचीचा हा पुतळा तयार करण्याचा निर्णय झाला, तो तेवढाच राहील याबाबत शंका उपस्थित करू नये’ असे स्पष्टीकरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिले आहे.

काय आहे आरोप ?

राज्य सरकार खर्च वाचवण्यासाठी शिवस्मारकाचा आराखडा बदलला आहे. या नव्या आरखाड्यानुसार  शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करुन  चौथाऱ्याची उंची वाढवण्यात आलीय  असा आरोप विरोधकांनी आज विधानसभेत केला. विधानसभेच्या शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित करत विरोधक आक्रमक झाले होते.

‘’आताचे सरकार छत्रपतींच्या पुतळयाची उंची ११२ फुटाने कमी करण्याचा कट रचत आहे. आमच्या काळात दिलेले डिझाईन बदलण्याचे अधिकार तुम्हाला आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची उंची कमी करु नका. हे धाडस केलात तर या महाराष्ट्रातील मराठी माणूस कधीही माफ करणार नाही’ असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिला. तर छत्रपतींचा असा अपमान सहन केला जाणार नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केले.

राज्य सरकारने या मुद्यावर स्पष्टीकरण द्यावे या मागणीसाठी विरोधकांनी सभात्यागही केला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज काही काळ तहकूबही करावे लागले.

आपली प्रतिक्रिया द्या