‘…अन्यथा ६ महिन्यांचा पगार कापू’; राज्य सरकारचा डॉक्टरांना इशारा

21

सामना ऑनलाईन । मुंबई

सामूहिक रजेवर जाण्याच्या अधिकाराचा वापर मागण्या मान्य करून घेण्यासाठी केला जात असल्यास योग्य नाही, असे उच्च न्यायालाने खडसावल्यानंतर आता राज्य सरकारने देखील निवासी डॉक्टरांना आज रात्री ८ पर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास सहा महिन्यांचा पगार कापला जाईल, असा इशारा राज्य सरकारने निवासी डॉक्टरांना दिला आहे.

निवासी डॉक्टरांना सुरक्षा देण्याचे लेखी आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. तसेच एक महिन्याच्या आत आश्वासन पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे डॉक्टरांनी कामावर रूजू व्हावे. रुग्णांच्या जीवाशी खेळ करू नये. नाही तर पगार कापण्याची कारवाई करू, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या