मुंबई, पुणे, ठाणे, सांगली बाद फेरीत

कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत मुलींमध्ये पुणे, ठाणे, सांगली यांनी तर कुमार गटात धाराशीव, पुणे ठाणे, मुंबई उपनगर, सांगली यांनी बाद फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या गटात रत्नागिरीने साताऱ्यावर 24-13 अशी एक डाव 2 गुणांनी मात केली. रत्नागिरीतर्फे पायल पवार, श्रेया सनगरे, आर्या डोर्लेकर यांनी, तर सातारातर्फे गीतांजली जाधव यांनी सुरेख खेळ केला.

दुसऱ्या एका सामन्यात पुण्याने धुळ्याचा 28-7 असा 21 गुणांनी धुव्वा उडवला. पुण्याच्या मानसी हरगणे, प्रेरणा कांबळे, दिपाली राठोडने चांगला खेळ केला. तर धुळय़ाच्या हंसिका पाटील  हिने एकतर्फी लढत दिली.

कुमार गटातील सामन्यात पुण्याने मुंबईचा 17-16 असा 6ः30 मिनिटे राखून 1 गुणाने पराभव केला. पुण्याकडून विवेक ब्राह्मणे, आकाश गायकवाडने विजयात मोलाची कामगिरी केली. पराभूत मुंबईकडून जनार्दन सावंत आणि रोहित केदारे यांनी चांगली लढत दिली.