नाशिकमध्ये रंगणार राज्यस्तरीय तायक्वाँदो, राज्यातून स्पर्धेसाठी 800 खेळाडूंचा सहभाग

तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने 31 वी राज्यस्तरीय सब ज्युनिअर क्यूरोगी व चौथी राज्यस्तरीय कॅडेट क्यूरोगी तायक्वाँदो स्पर्धेचे आयोजन नाशिक येथील इनडोअर हॉल, डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स  पंचवटी, नाशिक येथे करण्यात आले आहे.

रविवारपासून या राज्यस्तरीय स्पर्धेला सुरुवात होणार असून राज्यभरातून विविध जिह्यांतील जवळपास 800च्या आसपास खेळाडू आपले कसब आजमावणार आहेत. राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांना नाशिक येथे होणाऱया राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण  तायक्वाँदो असो. ऑफ महाराष्ट्रच्या वतीने देण्यात आले. यावेळेस महाराष्ट्र ऑलिंपिकचे महासचिव नामदेव शिरगावकर आणि तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव  संदीप ओंबासे उपस्थित होते.