राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे मालवण येथे उद्घाटन 

63
सामना ऑनलाईन । मालवण प्रतिनिधी 

योगाची महती आज जगभर पोचू लागली आहे. गेली ४५ वर्षे योगाच्या स्पर्धा होत असून या योगाला भारतीय ऑलीम्पिक संस्थेची इतर क्रीडा प्रकारा प्रमाणे मान्यता मिळालेली नाही. योगाला क्रीडा क्षेत्रात मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र योगा कल्चर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉ. सुरेश गांधी यांनी मालवण येथे रविवारी बोलताना केले.

महाराष्ट्र योगा कल्चर असोसिएशन अंतर्गत सिंधुदुर्ग योगा कल्चर असोसिएशन व निरामय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सातवी राज्य स्तरीय योगासन स्पर्धा २०१६-१७ चे मालवण स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे उद्घाटन कार्यक्रम झाला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ.एम.पी.पाटील, कार्याक्रमचे अध्यक्ष डॉ.सुभाष दिघे,आंतर राष्ट्रीय योग खेळाडू व योगा पंच चंद्रकांत पांगारे,योगा कल्चर अध्यक्षा व योग तज्ञा उमा चौगुले.आदि मान्यवर उपस्थित होते. या राज्यस्तरीय योगा स्पर्धेत १५ जिल्ह्यातील ३५० स्पर्धक सहभागी झाले होते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० योगा स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात योगाची चळवळ वाढली पाहिजे, योगा स्पर्धेत सिंधुदुर्गातील अनेक स्पर्धक सुवर्ण पदक विजेते आहेत. पुढील योगा स्पर्धेत सिंधुदुर्गातील एक टीम या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावी.असे झाल्यास या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन सफल होईल असे उमा चौगुले म्हणाल्या,तर जीवनात सुदृढ आरोग्य राहण्यासाठी  योगा हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. योगाचे ज्ञान प्रत्येकाने घेतले पाहिजे असे डॉ.सुभाष दिघे म्हणाले. यावेळी श्रीपाद पंतवालावलकर, डॉ .एम.पी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात योगा गीत सौ.तनिष्का कासवकर, सौ.प्रिया पावसकर, यांनी सादर केले. सूत्रसंचालन सुप्रिया गावकर व प्राजक्ता गावकर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या