पक्ष्यांचा किलबिलाट मंदावला; मोरांची संख्या मात्र वाढली

321

एकीकडे हिंदुस्थानात पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींमध्ये 79 टक्के घट झाल्याचे निष्पन्न झालेले असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांच्या संख्येत मात्र आश्चर्यकारकरीत्या वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सोमवारी झालेल्या सीएमएस परिषदेत प्रकाशित करण्यात आलेल्या या वर्षीच्या ‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड’च्या अहवालात ही माहिती मंगळवारी जारी करण्यात आली.

पक्ष्यांच्या जवळपास 101 प्रजातींचे संवर्धन होण्याची गरज आहे, असेही अहवालात सांगण्यात आले आहे. यातच देशात मोर मात्र भरपूर प्रमाणात आहेत, मात्र देशातील काही भागांमध्ये मोरांच्या संवर्धनावर लक्ष देण्याचीही गरज अहवालात नमूद करण्यात आली आहे. पक्ष्यांबाबतचा हा अभ्यास बंगळुरू, चेन्नई, नवी दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई या सहा मोठय़ा शहरांमध्ये करण्यात आला आहे.

चिमण्यांची संख्या स्थिर

पक्ष्यांच्या अहवालानुसार पक्षांच्या संख्येत 79 टक्क्यांनी घट झाल्याचे नमूद करण्यात आले असले तरी देशभरात चिमण्यांची संख्या मात्र तेवढीच राहिली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. गावपातळीवर चिमण्या वाढल्या असल्या तरी मोठय़ा शहरांमध्ये त्यांची संख्या तुलनेने कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालात हिंदुस्थानातील वेगवेगळ्या प्रजातींमधील 867 प्रकारच्या पक्ष्यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या