रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी सर जे. जे. रुग्णालयात अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. इस्रायलच्या सहकार्याने जे.जे. रुग्णालयात ही सेवा सुरू करण्यात आली. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ केला.
प्रगत प्रतिजैविक अॅव्रेलिक पेंटचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. हे नावीन्यपूर्ण पेंट काही तासांत 99.99 टक्के जीवाणू, विषाणू यावर नियंत्रण मिळविते. हे तंत्रज्ञान मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूतावास, ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हिंदुस्थानात आणले गेले आहे. इस्रायलचे मुंबईतील कौन्सुल जनरल कोबी शोशानी, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि डॉक्टर्स व परिचारीका यावेळी उपस्थित होत्या.