
महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकार जनता विरोधी, कुचकामी व षड्यंत्रकारी असे विधान संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी केले आहे.
चिचोंडी पाटील सोसायटी व नंतर ग्रामपंचायत मध्ये नुकतेच सत्तांतर झाले असून महाविकास आघाडीची सत्ता ग्रामपंचायत, सोसायटी मध्ये आली आहे. त्या पार्श्वभूमिवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली त्या प्रसंगी त्यांचे ग्रामस्थांकडून मोठ्या जल्लोशात स्वागत करण्यात आले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड मनोज आखरे यांनी मार्गदर्शन करताना असे म्हणाले महाराष्ट्राला फार मोठा इतिहास आहे. जगात क्रांती घडवलेले महामानव महाराष्ट्राच्या मातीतील आहेत. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले, राजमाता आहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा जोतीबा फुले, फातीमा बी शेख आदींसह ही संताचीही भूमी असून संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत सावता माळी, संत भगवानबाबा आदी संतानीही या भूमित जन्म घेऊन जगाला दिशा दिली असताना आज अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत या महामानव, संतांबद्दल चुकीच बोलून जाणिवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र सुरू असून विकासाचा विषयच पुढे येऊ नये यासाठी हे सर्व केले जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच महागाईने उच्चांक गाठला असून शेतकरी, कामगार, कष्टकरी, गावकरी यांच्या व्यथा जशाच्या तश्याच असून केवळ सत्तेच्या मोहापायी व सत्ता हस्तगत करण्याकडे सत्ताधारी प्रयत्नशिल असून या सर्व बाबी पाहाता संभाजी ब्रिगेड आकमक भूमिका घेत असून शिवसेना व महाविकास आघाडी सोबत संघर्षासाठी सर्वात पुढे असेल. तसेच यापुढे विकास कामात आडकाठी आणल्यास रस्तावर उतरून ब्रिगेड स्टाईलने आंदोलन केले जाईल, असंही ते म्हणाले.
या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती व शिवसेना नेते प्रविण कोकाटे म्हणाले शिवसेनेच्या अडचणीच्या काळात संभाजी ब्रिगेडने कोणतीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने शिवसेनेच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहण्याच्या निर्णयाबद्दल मी संभाजी ब्रिगेडचा ऋणी असून यापुढच्या काळात प्रत्येक निवडणुकीत संभाजी ब्रिगेड व महाविकास आघाडीच्या सहकार्याने विजय मिळवत विकास गंगा गावागावात पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे केले जाईल तसेच नवनिर्वाचीत सरपंच शरद पवार म्हणाले.