राज्य सरकारकडून ५६ कैद्यांची कर्जमाफी

42

सामना ऑनलाईन । मुंबई

कर्जमाफीसाठी आखडता हात घेणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत. असे असताना काही कैदांना मात्र कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांसाठी का होईना ही बाब दिलासादायक ठरणार आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रानं यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा लाभ नाशिक आणि नागपूर येथील कारागृहामध्ये कैद असलेल्या ५६ कैदांना होणार आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये अटकेत असले तरी ते व्यवसायानं शेतकरी आहेत. त्यांच्या चुकीची शिक्षा कुटुंबीयांना देता येणार नाही. त्यामुळे शेतकरी असल्याने आणि कर्जमाफीच्या सरकारच्या पात्रतेत बसणाऱ्या अशा ५६ कैद्यांच्या कुटुबीयांना त्याचा लाभ मिळणार आहे.

मुंबईचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरं तर ८८ कैद्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. मात्र त्यातील ३२ जणांचे अर्ज आयडी आणि कागदपत्र अपुरे असल्यांने नाकारण्यात आले. असे असले तरी त्यांनी पुन्हा अर्ज करता येणार आहे.

या कैंद्यांनी काही गुन्हा केला असला तरी शेतकरी म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा कारागृहात राहून जर जर फायदा होत असेल तर त्यांना परत नव्याने आयुष्यांची सुरुवात करता येईल, अशी अपेक्षा शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

कैद्यांना पुरेशा सुविधा मिळतात का याची खात्री करण्यासाठी त्यांनी नागपूरच्या जेलला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांना असे लक्षात आले की, यामध्ये काही शेतकरी कैदी न चुकता कर्जाचे हप्ते भरणारे होते. म्हणून आम्ही योजनीची सुरुवात केली व एक विशेष शिबीर आयोजित करून आधारद्वारे त्यांचे आयडी बनवले, अशी माहिती सचिन कुर्वे यांनी दिली. या उपक्रमाचे स्वागत शेतकरी कार्यकर्त्यांनी केले आहे.

ज्या कैद्यांना या योजनाचा लाभ मिळाला नाही त्या कैद्यांच्या कुटुंबांनी परत एकदा कागदपत्र सादर करण्यासाठी मदत करावी, असे शेतकरी कार्येकर्ते किशोर तिवारी यांनी सांगतिले.

आपली प्रतिक्रिया द्या