हिंदुस्थानात पहिल्यांदाच अजगराचे सीटी स्कॅन

61

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर

आतापर्यंत आपण माणसाचे सीटी स्कॅन केलेले ऐकले असतील. पण कधी एखाद्या प्राण्याचे, अजगराचे सीटी स्कॅन केलेले ऐकले आहे का? ओडिशामध्ये चक्क एका अजगराचे सीटी स्कॅन करण्यात आले आहे. अजगराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्यासाठीच त्याचे सीटी स्कॅन करण्यात आले.

स्नेक हेल्पलाईनशी संबंधित शुभेंदू मलिक यांनी सांगितले की, हिंदुस्थानात एखाद्या अजगराचे झालेले हे पहिलेच सीटी स्कॅन आहे. हे स्कॅन ओडिशातील एका खासगी रुग्णालयामध्ये करण्यात आले. ओडिशातील कोयंझर जिल्ह्यातल्या आनंदपूरमध्ये आढळलेले ८ फूट लांब अजगर फार गंभीर परिस्थितीत होते. त्याला ओडिशा येथील कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पशूवैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीअंती उपचार करण्यासाठी आधी सीटी स्कॅन करण्याचा निर्णय झाला. नंतर खासगी रुग्णालयामध्ये सीटी स्कॅन करण्यात आले. सध्या अजगरावर स्नेक हेल्पलाईनचे डॉक्टर उपचार करत आहेत.

master-1

आपली प्रतिक्रिया द्या