स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा ‘या’ बाबतीत सरस ठरला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’

1453

गुजरातमधील सरदार वल्लभभाई  पटेल यांचा पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटीने एका वर्षातच एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीने अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला नुकतेच एका बाबतीत मागे टाकले आहे.

सरदार सरोवर नर्मदा निगमने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान या स्मारकाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत 74 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातच स्मारकाला रोज जवळपास 15,036 पर्यटक भेट देतात अशी नोंद झाली आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी हा आकडा जवळपास 22,430 पर्यटकांवर जात असल्याचं सरदार सरोवर नर्मदा निगमच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे 133 वर्षांपासून उभ्या असलेल्या अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला रोज जवळपास 10,000 पर्यटक भेट देत आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटी देशातील पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंच पुतळा आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. गुजरातमध्ये नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाजवळ हा बांधण्यात आला आहे. या पुतळ्याचे गेल्यावर्षी 31 ऑक्टोबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या