सावत्र मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या इसमाची बायकोकडून हत्या!

2318
प्रातिनिधिक फोटो

सावत्र मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या बायकोनेच त्याची हत्या केल्याची घटना पंजाबमध्ये घडली आहे. राजकिशोर असं या माणसाचं नाव आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाब येथील लुधियानामध्ये राहणाऱ्या राजकिशोर याचं लग्न गीता नावाच्या महिलेशी झालं होतं. तिचं हे दुसरं लग्न आहे. या जोडप्यासोबत गीताच्या पहिल्या लग्नाची दोन मुलंही राहत होती. शनिवारी राजकिशोर रात्री दारू पिऊन घरी आला होता. घरी आल्यावर त्याने त्याच्या 15 वर्षांच्या सावत्र मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिला मारहाणही केली. गीतानेही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नव्हता. अखेर या झटापटीत गीताने राजकिशोरचा गळा आवळला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

गीताने त्वरित पोलीस स्टेशन गाठून गुन्हा कबूल केला. गीताच्या म्हणण्यानुसार, 2018 मध्येही त्याने गीताच्या मुलीवर अत्याचार करायचा प्रयत्न केला होता. पण, त्यावेळी कसंबसं ते प्रकरण मिटवण्यात राजकिशोर यशस्वी झाला होता. पण, गीता त्याच्यावर नाराज होती. या प्रकरणी पोलिसांनी गीता आणि तिच्या मुलांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या