पुणे हादरले, सावत्र वडिलांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार व निर्घृण हत्या

1944
प्रातिनिधिक फोटो

हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार व हत्या आणि उन्नाव बलात्कार व हत्या प्रकरण देशभरात गाजत असताना पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोसरी येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांनी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पीडिते मुलीचा मृतदेह तिच्या बहिणीला पिंपरी चिंचवड येथील दापोडीच्या राहत्या घरी सापडला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांनीमध्ये तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याचे पीडितेच्या आईने तक्रारीमध्ये म्हटले आहे. तसेच पीडितेच्या आईलादेखील जीवेमारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीमध्ये सांगितलं आहे.

गुरूवारी सायंकाळी पीडितेची बहीण घरी आली तेव्हा दार आतून बंद असल्याचे आढळले. बराच वेळ दार वाजवूनही कुणीच उघडत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर तिने ही माहिती आईला दिली. आईने तडक पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये फरार आरोपी हा रिक्षाचालक आहे. हत्येनंतर तो फरार झाला असून पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या