दीड वर्षाच्या सावत्र मुलाला जमिनीवर आपटून मारले, नराधम बापाला अटक

मध्य प्रदेशमध्ये एका नराधमाने त्याच्या दीड वर्षाच्या सावत्र मुलाला जमिनीवर आपटून मारून टाकले आहे. विनोद पारवे असे त्या नराधमाचे नाव असून तो पत्नी रोशनी अहिरवार आणि सावत्र मुलगा आर्यन याच्यासोबत बानक्षेरी भागात राहायचा.

आर्यन हा रोशनी व तिच्या बॉयफ्रेंडचा मुलगा होता. रोशनी ही अविवाहीत असताना गरोदर राहिली होती. आर्यनच्या जन्मानंतर तिचे विनोदसोबत लग्न झाले. विनोदने मुलाला स्वीकारण्याचे तिला कबूल केले होते. मात्र लग्नानंतर तो त्याचा तिरस्कार करू लागला. तो सतत त्याला मारहाण करायचा. रोशनी कायम त्याला समजवायची मात्र त्याचा काहिच परिणाम होत नव्हता.

गुरुवारी विनोदने रोशनीला काही सामान आणण्यासाठी बाजारात पाठवले त्यानंतर त्याने झोपलेल्या आर्यनला जमिनीवर आपटले. यात आर्यनच्या डोक्याला गंभीर जखम झाली व रक्त वाहू लागले. विनोदने हा अपघात दाखविण्यासाठी पाण्याने भरलेली टाकी त्यांच्या अंगावर टाकली. रोशनी जेव्हा घरी आली तिला आर्यन रक्ताच्या सड्यात पडलेला दिसला. त्यावेळी विनोदने तिला रोशनच्या अंगावर टाकी पडल्याचे सांगितले.

त्यानंतर विनोदने रोशनीला संशय होऊ नय़े म्हणून तत्काळ आर्यनला रुग्णालयात नेले. मात्र तेथे आर्यनला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दरम्यान रोशनीला विनोदवर संशय आल्याने तिने याबाबत तिचा भाऊ रवी अहिरवार याला सांगितले. त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. आर्यनचा शवविच्छेदनाचा अहवाल आला त्यात देखील त्याचा जमिनीवर आपटून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी विनोदची चौकशी केली असता त्याने त्याचा गुन्हा कबूल केला.

आपली प्रतिक्रिया द्या