बाप आणि मुलीत निर्माण झाले अनैतिक संबंध, दोघांनी मिळून गर्भश्रीमंत आईचा काटा काढला

संपत्ती आणि प्रेम ही संघर्षाची आणि वादाची बीजे रोवणारी मुख्य कारणे बनत चालली आहे. संपत्ती आणि प्रेमात नातीही नाहीशी होत जातात आणि त्यातून पुढे जे घडत जातं तं अकल्पनीय आणि भयंकर असतं. असंच एक प्रकर कर्नाटकातील बंगळुरू शहरात घडलं आहे. इते राहणाऱ्या एका माणसाचे सावत्र मुलीसोबत अनैतिक प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यामुळे मुलीने तिच्या सावत्र वडिलांच्या मदतीने त्यांच्या प्रेमसंबंधात आड येणाऱ्या आईचा काटा काढला. अर्चना रेड्डी असं मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव असून ही घटना 27 नोव्हेंबरची आहे. रात्री दहाच्या सुमारास अर्चना यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चनाचा पहिला घटस्फोट झाल्यानंतर तिने जिम इन्स्ट्रक्टर असलेल्या नवीन (33 वर्षे) नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. पहिल्या नवऱ्यापासून अर्चनाला एक मुलगी झाली होती. युविका (21 वर्ष) असं तिच्या मुलीचं नाव आहे. नवीनशी लग्न केल्यानंतर अर्चनाला कळालं की नवीन आणि युविका यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले आहेत. हे कळाल्यानंतर संतापलेल्या अर्चनाने नवीनला घरातून हाकलून दिलं होतं. नवीनला हाकलून दिल्याने युविकानेही अर्चनाचं घर सोडून दिलं होतं आणि ते दोघे एकत्र राहात होते. अर्चना ही गर्भश्रीमंत होती, तिच्याच पैशांवर नवीन आणि युविका मजा मारत होते. अर्चनाच्या घरातून बाहेर पडल्याने नवीन आणि युविका या दोघांना पैशांची चणचण जाणवायला लागली ज्यामुळे त्यांनी अर्चनाकडे संपत्तीत वाटा मागायला सुरुवात केली होती.

दरम्यानच्या काळात अर्चनाची रोहीत नावाच्या व्यक्तीशी मैत्री झाली होती. त्याचा वापर करून अर्चनाने नवीनला त्रास देण्याचा प्लॅन तयार केला होता. युविकाला अर्चनाच्या या प्लॅनबद्दल कुणकुण लागली आणि तिने ही गोष्ट नवीनला सांगितली. संतापलेल्या नवीनने अर्चनाला ठार मारण्याचा कट रचला. नवीनने त्याच्या मित्रांची मदत घेऊन अर्चनाचा खून केला. अर्चनाच्या खुनानंतर पोलिसांनी नवीन आणि युविका या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी संपत्तीसाठीच अर्चनाचा खून करवल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. नवीनच्या ज्या मित्रांनी अर्चनाचा खून केला, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणून काम केलं होतं, का त्यांचा अन्य काही हेतू होता हे अद्याप कळू शकलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.