तरुण दिसण्यासाठी ‘तो’ घेतो सापाचं विष

118

सामना ऑनलाईन । कॅलिफोर्निया

साप या विषारी प्राण्याला पाहून अनेकांची भंबेरी उडते. पण असाही एक व्यक्ती आहे जो चक्क सापांमध्येच राहतो आणि सापांमुळेच फीट असल्याचे सांगतो. कॅलिफोर्निया येथे राहणारा एक व्यक्ती तरुण आणि फीट राहण्यासाठी स्वत:ला सापाचं इंजेक्शन देत असल्याचे समोर आले आहे.

स्टीव लुडविन असे या विष घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. स्टीव गेल्या ३० वर्षांपासून सापाचे विष घेत आहे. वयाच्या १७व्या वर्षापासून त्याने विष घेण्यास केलेली सुरुवात आजही चालू आहे. स्टीव तरूण आणि फिट दिसण्यासाठी इंजेक्शनद्वारे सापाचे विष घेतो. स्टीवकडे १८ साप आहेत, त्या सापांचे तो विष काढतो. त्याच्यासाठी ही प्रक्रिया अतिशय वेदनादायक असली तरी यात सापांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याचे त्याने सांगितले आहे.

लहान असल्यापासूनच त्याने सापांविषयी वाचण्यास सुरुवात केली होती. स्टीव ६ वर्षांचा असताना गेटर नावाच्या सापाने त्याला सर्पदंश केला होता. या दंशाने स्टीवला कोणतेही नुकसान झाले नव्हते मात्र त्याने त्रास झाल्याचे सांगितले. स्टीव १० वर्षांचा असताना त्याच्या वडिलांसोबत मियामी या शहरांत गेला होता. त्यावेळी तो बिल हास्ट या व्यक्तीला तो भेटला, हास्ट रेटलस्नेक आणि कोबरा या विषारी सापाचे विष घेत होते. विष घेतल्याने शरिराला फायदा होतो असे हास्ट म्हणणे होते. त्यांचा मृत्यू वयाच्या १००व्या वर्षी झाला होता.

बिल हास्ट यांच्या भेटीने स्टीव प्रभावित झाला आणि तेव्हापासून सापांविषयी अभ्यास सुरू केला तो अभ्यास आजही चालू आहे. डॉक्टर गेब्रिइल वेस्टन यांनी स्टीव त्यांच्या सुदैवानेच जिवंत असल्याचे सांगितले होते. ‘डेली मेल’च्या अहवालानुसार स्टीव संशोधकांसोबत काम करून मानवी रक्त असलेले ऍन्टीबॉडी तयार करु इच्छितो, यासाठी त्याच्या रक्ताचा वापर होऊ शकतो. आयुष्यात सकारात्मक गोष्टी केल्या आहेत त्यामुळे मरताना आनंदाने मरेन असेही त्याने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या