जाडेजानं स्मिथला चकवत असा उडवला ‘त्रिफळा’

17

सामन ऑनलाईन । रांची

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी रवींद्र जाडेजानं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिवन स्मिथचा अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडवला. स्विव्हन स्मिथचा त्रिफळा उडवल्यानंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी एकच जल्लोष केला. प्रेक्षकांनी या अप्रतिम चेंडूला दाद देत मैदानात एकच जल्लोष केला.

रवींद्र जाडेजानं डाव्या यष्टीबाहेर टाकलेला चेंडू पॅडनं खेळण्याचा प्रयत्न स्मिथच्या अंगलट आला. स्मिथला नेमकं काय झालं हे कळायच्या आतच चेंडूनं फिरकी घेत उजवी यष्टी उडवली. स्टिव्हन स्मिथनं १४ धावा केल्या.

जाडेजाचा तो अप्रितिम चेंडू : पाहा व्हिडिओ

आपली प्रतिक्रिया द्या