शेअर बाजाराची घसरगुंडी कायम; सहा सत्रांत गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटींचे नुकसान

शेअर बाजारात विक्रीचा जोर कायम असल्याने शेअर बाजार सातत्याने घसरत आहे. या आठवड्यात तीन दिवस बाजार लाल निशाणात आहे. गेल्या आठवड्यात बाजारात काही प्रमाणात तेजी दिसली होती. त्यानंतर विक्रीचा सिलसिला सुरू झाल्याने बाजारात सातत्याने घसरण होत आहे. सलग सहा सत्रांमध्ये शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. या सहा सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे 12.74 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकांत आद 509.24 अंकानी घसरण होत तो 56598वर बंद झाला. तर निफ्टीमध्येही घसरण बघायला मिळाली. निफ्टीचा निर्देशांक 16870 वर सुरू झाला तर त्याची 16820 अंकापर्यंत घसरण झाली होती. तो 16958 वर बंद झाला. गेल्या सहा सत्रांत मुंबई बाजारातील लिस्टेट कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 28,134,219 कोटींची घट झाली असून तो 26,859,546 वर पोहचला आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत असलेल्या अस्थिरतेच्या वातावरणामुळे परदेशी गुतंवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावला आहे. त्यामुळे बाजारात घसरण होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. देशातील बाजार मजबूत अशला तरी मंदीचा धोका असल्याने गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार नसल्याने ते पैसे काढत आहेत. कमोडिटी बाजारातही घसरण होत असल्याने महागाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

शेअर बाजाराप्रमाणेच रुपयाची घसरणही सुरूच आहे. बुधवारी रुपयामध्ये 40 पैशांची घसरण होत डॉलरच्या तुलनेत तो निचांकी स्तरावर 81.93 वर पोहचला आहे. रुपयांचे मूल्य घटल्याने आयात महाग होते. तसेच आयात केलेल्या वस्तू महाग होतात. त्यामुळे याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. आगामी काही काळात बाजारात चढउतार कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.