कश्मीरमधील पत्थरबाजांना पाच वर्षांचा तुरुंगवास होणार

22

सामना ऑनलाईन । श्रीनगर

सरकारविरोधात घोषणाबाजी, तोडफोड करणाऱया दंगलखोरांविरोधात जम्मू-कश्मीर सरकारने कडक पावले उचलली आहेत. दगडफेक करून सार्वजनिक तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱया आंदोलकांना यापुढे पाच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तसेच आंदोलकांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाईही घेतली जाणार आहे. राज्य सरकारने तसा अध्यादेशच जारी केला आहे.

जम्मू अँड कश्मीर पब्लिक प्रॉपर्टी (प्रिक्हेन्शन अँड डॅमेज) (दुरुस्ती) किधेयक २०१७ नुसार सार्कजनिक संपत्तीच्या होणाऱया नुकसानाशी संबंधित सर्क कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन कायदा तातडीने अमलात आणण्यात आला असून त्याला राज्यपाल एन.एन. क्होरा यांनी मंजुरीदेखील दिली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱया व्यक्ती आणि संघटनांना या नव्या कायद्यामुळे लगाम बसणार आहे. दंगलीवेळी सार्कजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान करणे हा दंडनीय गुन्हा आहे. हा गुन्हा घडण्यासाठी प्रोत्साहन देणाऱयांना यापुढे दोषी धरण्यात येणार आहे. मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांच्या शिफारसीवरून राज्यपाल व्होरा यांनी जम्मू-कश्मीरच्या संविधानातील कलम ९१ नुसार हा अध्यादेश राज्यात लागू केला आहे.

कश्मीरला सीरिया होऊ द्यायचे नाही – शर्मा
नवी दिल्ली व कश्मीरातील हिंसाचार संपवण्यासाठी कोणासोबतही चर्चा करण्यास आपण तयार आहोत. तेच आपले उद्दिष्ट आहे. कश्मीर हिंदुस्थानातील सीरिया होऊ नये यालाच आपला प्राधान्यक्रम असल्याचे कश्मीरातील केंद्राचे संवादक दिनेश्वर शर्मा यांनी आज सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या