हिंगोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांच्या धुमाकूळ, १० बालकांना चावा

40

सामना ऑनलाईन । हिंगोली

हिंगोली शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी १० बालकांना चावा घेतला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हिंगोली शहरातील बावन खोली, आजम कॉलनी, महादेववाडी,नगरपरिषद कॉलनी या परिसरात कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. काल या कुत्र्यांनी चावा घेतल्याने १० लहान मुले गंभीररित्या जखमी झाली आहेत. या मुलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकाराने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

पिसाळलेल्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करा अशी मागणी पीडितांचे नातेवाईक आणि नागरिकांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या