शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जोरदार इनकमिंग – सुरू असून खोपोलीतील भाजपचे उपशहरप्रमुख देवेंद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले आहे. या सर्व कार्यकर्त्यांनी – शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार केला – आहे. रायगड उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. त्यामुळे खोपोलीत भाजपला जोरदार खिंडार – पडले आहे.
खोपोलीच्या लवजी उदयविहार येथील – भाजपचे युवा मोर्चा उपशहरप्रमुख देवेंद्र पाटील – यांच्यासह मोहन कचरे, महेश मोहिते, दीपक – कुंभार, विजय वाघ, संजय दबके, ओम विश्वकर्मा, सुभाष गायकवाड, तन्मय कचरे, प्रवीण कोरडे, अथर्व कुलकर्णी, राजन जेम्स, अरविंद स्वामी, मनोज विश्वकर्मा, सचिन मोहिते, गणेश मोहिते, श्रवण कचरे, अनिकेत देशमुख, संदेश देशमुख, अरुणा पाटील, गायत्री वाघ, संचिता दबके, माधुरी मोहिते, नीता पाटील, श्रद्धा साठे, वर्षा कचरे, श्रुती गायकवाड, कुमकुम कुंभार, सरिता विश्वकर्मा, प्रियंका शर्मा, रंजना कचरे, प्रीती शर्मा, सोनाली चौधरी, आरती सोनवणे आदी कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकला. यावेळी तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, संपर्कप्रमुख भीमसेन बडेकर, माजी पंचायत समिती उपसभापती पंढरीनाथ राऊत, कृष्णा जाधव, धनश्री चंदन, मुकेश पाटील उपस्थित होते.