पुन्हा ‘सैराट’ होता होता वाचला! ऑस्ट्रेलियन खेळाडूचे प्रेयसीच्या भावानेच केले अपहरण अन्…

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू स्टुअर्ट मॅकगिल (Stuart MacGill) याचे गेल्या महिन्यात स्टुअर्ट मॅकगिल याचे त्याच्या घराजवळून अपहरण करण्यात आले होते. या अपहरण प्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली असून यातील एक जण स्टुअर्ट मॅकगिल याची प्रेयसी मारिया ओ मियेघेर (Maria O’Meagher) हिचा सख्खा भाऊ असल्याचे उघड झाले आहे.

ऑस्ट्रेलियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, स्टुअर्ट मॅकगिल याचे गेल्या महिन्यात 14 एप्रिलला रात्री 8 वाजता सिडनी येथून त्याच्या राहत्या घरासमोरून गनपॉइंटवर अपहरण झाले होते. अपहरणादरम्यान त्याला आरोपींनी मारहाणही केली होती. या प्रकरणी न्यू साउथ वेल्स पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यातील एका आरोपीचे नाव मारिनो स्टॉयरोपउलोस असून तो स्टुअर्ट याच्या प्रेयसीचा भाऊ आहे.

याबाबत ‘लिंकडिन’ने दिलेल्या वृत्तानुसार, स्टुअर्ट मॅकगिल याची प्रेयसी मारिया हिचे एक रेस्टॉरंट असून याच रेस्टॉरंटमध्ये मॅकगिल जनरल मॅनेजर म्हणून काम करतो. मॅकगिल याच्या अपहरण प्रकरणात आपल्या भावाचे नाव आल्याने मारिया हैराण झाली आहे. मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने गेल्या वर्षीच भावाशी संबंध तोडले होते, असे सांगितले.

‘मी आणि मॅकगिल रिलेशनशीपमध्ये असून या प्रकरणामुळे आम्ही दोघेही घाबरले आहोत. मला असुरक्षित वाटत असून हे सर्व का घडले याबाबत काही कळत नाहीय. मी आणि माझा भाऊ वेगळे राहतो. सध्या मॅकगिल सुरक्षित आहे’, असे मारिया म्हणाली.

1 तास बंधनात ठेवले

दरम्यान, सिडनीतून अपहरण झाल्यानंतर अपहरणकर्त्यांनी स्टुअर्ट मॅकगिल याला एक तास बंधनात ठेवले होते आणि मारहाण केली होती. यानंतर त्याला रस्त्यावर फेकून दिले होते. मॅकगिल 6 दिवस हॉटेलमध्ये राहिला आणि त्यानंतर त्याने पोलिसांन या घटनेबाबत माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या