झगमगीत गजरा! नीट वाचता यावं यासाठी तरुणीने ट्युबलाईट केसात खोचली

घरी लाईट नसल्याने रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करून यश मिळवल्याची उदाहरणे आपण ऐकली आहेत. चीनमध्ये एक तरुणी अशी सापडली आहे जिने अख्खी ट्युब केसात खुपसली. केसातल्या या झगमगती गजऱ्याच्या उजेडात ती अभ्यास करत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. चीनमधील हेबेईमधील एका विद्यापीठाने हेबेई नावाच्या सशल मीडिया मंचावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या विद्यापीठाने व्हिडीओबाबत माहिती देताना म्हटलंय की ही ट्युबलाईट या तरुणीने तिच्या मैत्रिणीकडून उधारीवर घेतली होती. अभ्यासाच्या हॉलमधील लाईट गेल्याने या तरुणीने ही आयडीया करत तिचा अभ्यास सुरूच ठेवला होता. या तरुणीचा व्हिडीओ 29 कोटीवेळा पाहिला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडीओवर 17 हजार प्रतिक्रियाही आल्या आहेत. ही तरुणी पदव्युत्तर परीक्षेची तयारी करत असून ही परीक्षा कठीण असते. या परीक्षेमध्ये परदेशी भाषांचे ज्ञान, राजकारण, गणित आणि सामान्य ज्ञान यांची चाचणी घेतली जाते.