नीट’ तोंडावर आली तरी हॉलतिकीटचा पत्ता नाही

33

सामना ऑनलाईन । मुंबई

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘नीट’ ही राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा तोंडावर आली तरी अद्याप हॉलतिकीटचा पत्ता नाही. ही परीक्षा घेणाऱया केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात हॉलतिकीट दिले जाईल, असे जाहीर केले होते, परंतु आतापर्यंत त्यासंदर्भात कोणत्याही सूचना मंडळाने काढलेल्या नाहीत. त्यामुळे देशातील लाखो विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.

‘नीट’ परीक्षा येत्या ६ मे रोजी घेण्यात येणार आहे. देशभरातील ११ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसतात. परीक्षेबाबत जाहीर करतानाच सीबीएसईने हॉलतिकिटे आपल्या अधिकृत वेबसाइटवर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात उपलब्ध होतील असे सांगितले होते. मात्र अजूनही त्याबाबत काहीच हालचाली नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या