विद्यार्थ्याने सांगितला ‘जावा’चा अर्थ, नेटकरी झाले लोटपोट

25

सामना ऑनलाईन । मुंबई

सोशल मीडियावर कधी काय शेअर होईल, ते सांगता येत नाही. संवाद असलेल्या विनोदांची जागा आता भन्नाट आणि मजेशीर मीम्सने घेतली आहे. पण, तरीही विनोदी संवाद अथवा प्रश्नोत्तर यांनी हसवणूक केली जातेच. असंच काहीसं झालंय ते व्हायरल झालेल्या एका फोटोच्या बाबतीत.

केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी आपल्या ट्विटरवरून एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात एका प्रश्नाला विद्यार्थ्यांने दिलेलं उत्तर आहे. यात ‘जावा’ या कॉम्प्युटर स्क्रीप्टविषयी प्रश्न विचारण्यात आला आहे. जावा म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं आहे की, सर्वसामान्य भाषेत सांगायचं झालं तर जावा हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे. जा या शब्दाचा हिंदीतील अर्थ होतो ‘जाणे’ आणि ‘वा’ या शब्दाचा तामीळ अर्थ होतो ‘येणे’. थोडक्यात ‘जावा’ म्हणजे ये-जा करणे. या फोटोत मायक्रोसॉफ्टबद्दलही विचारण्यात आलं आहे. त्यावरील उत्तरात असं म्हटलं आहे की, मायक्रोसॉफ्ट एका प्रकारचं सर्फ एक्सल आहे, जे कॉम्प्युटरची सफाई करायचं काम करतं.

आता हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या नसत्या तरच नवल. रिट्वीट करत नेटकऱ्यांनी धमाल उडवून दिली आहे. पण, रिजीजूंनी मात्र पालक आणि शिक्षकांनी शिक्षणाविषयी कसा दृष्टिकोन ठेवावा, याबद्दल सल्ला दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या