पुण्यातील विद्यार्थ्याचा लायन्स पॉईंटच्या दरीत पडून मृत्यू

34

सामना प्रतिनिधी । पुणे

पुण्यातील एका विद्यार्थ्याचा गुरुवारी सायंकाळी लोणावळ्याजवळील लायन्स पॉईंटच्या दरीत पडून मृत्यू झाला. दुपारी ही घटना उघड झाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू टीमच्या सहाय्याने रात्री उशिरा हा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. पियूष संजीव रस्तोगी (वय २० वर्ष, रा. श्रीनिकेतन हॉस्टेल, कोथरुड बसस्थानक मूळ रा. अलादबाद, उत्तरप्रदेश), असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पुण्यातील आगरवाल क्लासेस टिळकरोड येथे सीए करत होता.

रस्तोगी हा बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरुड हॉस्टेलमधून त्याची दुचाकी गाडी क्र. (युपी ७० सीसी ९१५५) घेऊन बाहेर पडला होता. मात्र, तो कोठे गेला याबाबत कोणाला माहिती नव्हती. रात्री तो हॉस्टेलला परत न आल्याने व संपर्क देखील होत नसल्याने त्याचा भाऊ आयुष याने आज सकाळी कोथरूड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. सकाळी स्थानिक दुकानदारांना पॉईंटजवळ दुचाकी गाडी दिसल्याने त्यांनी तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच शिवदुर्ग मित्र या रेक्यू टिमच्या मदतीने दरीत उतरून पाहणी केली असता जवळपास ६०० ते ७०० फूट खोल अंतरावर पियुष रस्तोगीचा मृतदेह मिळून आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या