मेट्रोमध्ये पाय पसरून बसताय? मग ‘ही’ तरुणी अद्दल घडवणार

66

सामना ऑनलाईन । मॉस्को

मेट्रोने प्रवास करताना जर तुम्हाला पाय पसरून बसण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुणी मेट्रोमध्ये पाय पसरून बसलेल्या तरुणांच्या पायांवर पाणी ओतताना दिसत आहे. अॅना दोवगालिक असे या वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीचे नाव आहे.

रशियामध्ये राहणारी ही तरुणी पाण्यामध्ये ब्लिच मिसळून ते पाणी पास पसरून बसणाऱ्या तरुणांच्या पायावर टाकते. 30 लीटर पाण्यात ही तरुणी 6 लीटर ब्लिच मिसळत आणि मेट्रोमध्ये पाय पसरून बसणाऱ्या लोकांच्या पायांवर टाकते. यामुळे काही मिनिटांत पाणी टाकलेल्या तरुणांच्या कपड्यांचा रंग खराब होते. रशियातील लैंगिक असमानतेविरोधात राग व्यक्त करण्यासाठी अॅनाने हे पाऊल उचलले आहे. सध्या सेंट पीटर्सबर्गमध्ये तिने ही मोहीम सुरू केली आहे.

याबाबत अॅना सांगते की, सार्वजनिक ठिकाणी अयोग्य पद्धतीने बसण्याी समस्या संपूर्ण जगभरात आहे. परंतु याविरोधात आवाज उठवण्याची सुरुवात मी केली आहे. अनेक चॅनेलने तिची ही मोहीम खोटी असल्याचे म्हटले परंतु अॅनाने याचा व्हिडीओ शेअर करून हे सत्य असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिनही असेच पाय पसरून बसतात असे तिला कोणी विचारले की ती शांत होते. विशेष म्हणजे यापूर्वी देखील अॅना आपल्या अनोख्या आंदोलनामुळे चर्चेत आली होती. अपस्कर्टींग अवेअरनेस कॅम्पेन अंतर्गत तिने आपली स्कर्ट सार्वजनिक ठिकाणी वर केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या