‘जेएनयू’च्या दलित विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या

19

सामना ऑनलाईन, हैदराबाद – आंध्र प्रदेशमधील हैदराबाद विद्यापीठाचा पीएच.डी.चा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येने संपूर्ण देश गतवर्षी हादरला असतानाच ‘जेएनयू’ विद्यापीठाच्या आणखी एका संशोधक विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे.

मुथुकृष्णन ऊर्फ रजनी क्रिश असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा एमफिलचा विद्यार्थी होता. त्याने दिल्लीत मुर्निका येथे आपल्या मित्राच्या घरी आत्महत्या केली. तो हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी होता. हा रजनी अनुसूचित जातीतील विद्यार्थी आहे. रोहित वेमुलाला न्याय मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या चळवळीचा रजनी हा सक्रिय कार्यकर्ता होता. जेएनयूत रजनी हा एमफिलचा अभ्यास करत होता. रजनी हा तामीळनाडूतील सालेमचा रहिवासी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या