राष्ट्रगीताचा अवमान ‘ते’ होते सेल्फी काढण्यात गुंग!

39

सामना ऑनलाईन । जम्मू-कश्मीर

राष्ट्रगीतावरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. राष्ट्रगीतावरून आणखी एक वाद समोर आला आहे. जम्मू-कश्मीरच्या राजौरी येथील बाबा गुलाम शाह बादशाह युनिव्हर्सिटीमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना काही युवक सेल्फी काढण्यात व्यस्त असल्याचं दिसून आलं आहे. तसा व्हिडोओ समोर आला आहे. युनिव्हरर्सिटीच्या सिल्वर रोलिंग ट्रॉफीच्या कार्यक्रमादरम्यानची ही घटना आहे. या कार्यक्रमाला जम्मू कश्मीरचे गव्हर्नर एन व्ही वोहरा, राजौरी पोलीस उपायुक्त तसेच युनिव्हर्सिटीचे कुलगुरू देखील उपस्थित होते.

बाबा गुलाम शाह बादशाह युनिव्हर्सिटीमधील एका व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सर्वजन उभे राहिले असल्याचं दिसत आहे. मात्र काही विद्यार्थी त्यावेळी खाली बसून सेल्फी काढण्यात गुंग होते. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या कृत्याबद्दल त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच असं वागणं चिंताजनक असल्याचं काही लोकांनी म्हटलं आहे. हे विद्यार्थी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि समारोप अशा दोन्ही वेळी राष्ट्रगीतासाठी उभे राहिले नाही. त्यामुळे त्यांनी हे कृत्य त्यांनी ठरवून केलं असल्याचं काहींनी म्हटलं. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रगीतासाठी उभे न राहिलेल्या एका अधिकाऱ्याला विरोध करणाऱ्या काही विद्यार्थ्यांवर किश्तवाड येथे लाठीचार्ज करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या