गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेनेकडून गुणगौरव

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

दहावी आणि बारावीत ७५ टक्कयांहून अधिक गुण मिळविणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सोमवारी स्वामी समर्थ कार्यालयात शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोकण बोर्डातील यशानंतर आता कोकणातील विद्यार्थ्यांनी आता स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळवावे असे आवाहन यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.

यावेळी नव्यानेच नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांचा वायकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक इतर पदाधिकारी उपस्थित होते.

summary…student feliciated by shivsena