विद्यार्थ्यांचा देशभक्तांना अनोखा सलाम!

78

सामना प्रतिनिधी । मुंबई

स्वातंत्र्य  मिळण्यासाठी ज्या असंख्य हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, जे क्रांतिकारक फासावर गेले अशा देशभक्तांना एचआर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. महाविद्यालयाच्या रोट्रॅक्ट क्लबद्वारे हा उपक्रम रेल्वे स्टेशन, समुद्र किनाऱयावर  राबवण्यात आला. शेकडो विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.

एचआर महाविद्यालयाच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. टीआरडी हे एचआर कॉलेजच्या रोट्रॅक्ट क्लबद्वारा सुरू झालेली मोहीम असून त्याअंतर्गत हा कार्यक्रम राबवला होता. देशासाठी बलिदान दिलेल्या देशभक्तांना विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने सलाम दिला. नुकतेच छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे 100 रोट्रॅक्टर्सनी फ्लॅश मॉमोचे आयोजन केले. चौपाटीवर या रोट्रक्टर्सनी हातात मोबाईल मॉबच्या माध्यमातून हिंदुस्थानचा नकाशा तयार केला. कृत्रिम मेणबत्त्यांच्या सहाय्याने कँडल मार्चही काढण्यात आला. यावेळी देशभक्तीपर गाण्यांच्या माध्यमातून देशभक्ती व्यक्त करण्यात आली. स्टेशनच्या विधिध भागात काम करणाऱया मान्यवरांना त्यांच्या योगदानाबद्दल मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला रोट्रक्ट क्लबच्या ट्रस्ट विथ डेस्टिनीच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या नायकांना सलाम करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या