शांतादुर्गा हायस्कुलच्या विद्यार्थांनी बांधला वनराई बंधारा

सामना ऑनलाईन । मालवण

लाईक कराट्विट करा

मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील श्री शांतादुर्गा हायस्कुलच्या विद्यार्थांनी पाटकरवाडी येथील ओहोळावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. या बंधाऱ्यामुळे या भागात पाण्याचा संचय होण्यास मदत होणार आहे. हा बंधारा उभारण्याच्या कामात प्रशालेच्या १०८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थांनी केलेल्या या श्रमदानाचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

मातीने भरलेली पोती व दगड यांचा वापर करून हा बंधारा उभारण्यात आला. याकामी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक  जे. एन. पाटील, शिक्षक  खोत,  कुबल, शि्क्षिका दळवी, केळुसकर, मालवदे, कर्मचारी वरक, हडकर तसेच पाटकरवाडी येथील माजी सरपंच प्रमोद पाटकर आदींचे सहकार्य लाभले.